धुळे : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी बीड, लातूर, औरंगाबाद जिल्ह्यात अशा घटना समोर आल्या आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अनेक ठिकाणी वेळेत तोड झाली नाही. त्यामुळे कालावधी पूर्ण होऊनही ऊस फडातच आहे. धुळे जिल्ह्यातील जुने कोडदे शिवारातील ऊसाची वेळेत तोड झाली असती तर 40 एकरातील ऊस जळून खाक झालाच नसता. दोंडाईचा येथील जुने कोळदे येथे उसाच्या क्षेत्राला चाळीस ते पन्नास एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. गावातील तरुण व दोंडाईचा अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचल्याने आग आटोक्यात आणली मात्र, नुकसान टाळता आले नाही.