यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तब्बल ४२ वर्षांचा विक्रम मोडला गेला. यवतमाळ जिल्ह्यातील गावांना पाण्याचा वेढा पडला. गावातील लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी परिसरातून रेस्क्यू केलेल्या २५० लोकांना एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आलंय.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील आनंदनगर येथे अडकलेल्या 110 जणांना राज्य आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने मोठ्या जिगरीने बाहेर काढून वाचविले आहे.
आनंदनगर येथील लोक 24 तास पासून पुरात अडकून होते. पाण्याचा मोठा वेढा गावाला पडला होता. या ठिकाणी बोट चालवायला सुद्धा त्रास जात होता.
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील शिवालय या ठिकाणी पोहचले. त्यांनी यवतमाळ शहरातील रेस्क्यू केलेल्या लोकांशी संवाद साधत सर्व मदतीचे आश्वासन दिले.