सलमान खान याने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सलमान खान याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त अशी बघायला मिळते.
आज आम्ही तुम्हाला सलमान खान आणि धर्मेंद्र यांच्यामधील एक मोठा किस्सा सांगणार आहोत. धर्मेंद्र यांच्यावर चक्क सलमान खान याची माफी मागण्याची वेळ आली होती.
दिल तेरा आशिक या गाण्याच्या लॉन्चिंग कार्यक्रमाला धर्मेंद्र हे उपस्थित होते. यावेळी माधुरी दीक्षित देखील उपस्थित होती. यावेळी धर्मेंद्र यांनी धक्कादायक विधान केले होते.
धर्मेंद्र हे स्टेजवर गेल्यानंतर माधुरीचे काैतुक करताना दिसले. सलमान खान विषयी बोलताना ते चक्क म्हणाले की, माधुरीसोबत मुलगा सुलेमान हा...धर्मेंद्र यांचे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले.
आपली चूक लक्षात येताच सर्वांसमोर सलमान खान याची माफी मागताना धर्मेंद्र हे दिसले होते. मात्र, धर्मेंद्र माफी मागत असतानाच सलमान खानने त्यांची मिठी घेतली.