प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये प्रत्येक आठवड्यात नवनवीन पाहुणे येत असतात,या पाहुण्यांबरोबर कपिल खूप धमालही करतो. या आठवड्यात द कपिल शर्मामध्ये डान्स स्टार्स हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडची प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर गीता कपूर, गणेश आचार्य आणि टेरेंस लुईस या शोमध्ये आता पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत.
गणेश आचार्य आणि गीता गोविंदाच्या ‘किसी डिस्को में जाए’या गाण्यावर डान्स करणार आहेत.
कपिल शर्मानं गीता कपूरसोबत सेटवर फ्लर्ट केलं. सोबतच या एपिसोडमध्ये कपिल गीतासाठी गाणंसुद्धा गाणार आहे. प्रदर्शित झालेल्या शोच्या प्रोमोमध्ये कपिल गीताला म्हणतो, मला तू खूप आवडतेस. उद्या, जेव्हा मी म्हातारा होईल तेव्हा,आपण गीतावर प्रेम करायचो मात्र ते कधी बोललो नाही, असं वाटू नये म्हणून आताच तुला सांगतोय.
स्टेजवर सर्वांना एकत्र पाहून अर्चना पूरनसिंहलाही स्वतःला थांबवता आलं आणि तिनं ही खूप डान्स केला.
जग्गु दादा उर्फ जॅकी श्रॉफ यांची भूमिका साकारत कृष्णा अभिषेकने तिन्ही पाहुण्यांची मज्जा उडवली.
त्याचवेळी या प्रसिद्ध डान्सर्ससह शोमधील अन्य कलाकारांनी देखील प्रचंड धमाल केली.