नागपूर : नागपुरातील कापसी भागात लाकडाच्या कारखान्याला आग लागली. ही लागलेली आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय.
आज पहाटेच्या वेळी आरामशीन आणि लागडाचे साहित्य बनविणाऱ्या कंपनीला आग लागली. लाकूड असल्याने आग वेगाने पसरली.
मात्र अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहचल्या. जवानांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आगीवर नियंत्रण आणलं.
कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. आगीच कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही.
नागपूर-भंडारा रोडवरील लाकडाचे साहित्य बनविणाऱ्या कंपनीला आग लागली. अग्निशमन दलाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.