Photos | श्रमदानातून कायापालट, यशोगाथा नाशिकच्या आदिवासी भागातील झारवड खुर्द शाळेची
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात अनेक सुविधांची कमतरता आहे. मात्र, अशा परिस्थितीतही तेथील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक झारवड खुर्द.
Follow us
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात अनेक सुविधांची कमतरता आहे. मात्र, अशा परिस्थितीतही तेथील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक झारवड खुर्द.
या शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी लोकसहभागातून आदिवासी भागातील मुलांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळेच येथे सुसज्ज इमारत आणि प्रसन्न व आल्हाददायी वातावरण निर्माण होऊ शकलं.
या कामामुळेच आता या ठिकाणी 24 तास वीज आणि पाणी उपलब्ध आहे.
झारवड खुर्दच्या शाळेतील शिक्षकांनी शाळेसाठी सोयी निर्माण करतानाच मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावरही लक्ष दिलं.
या शाळेत ई लर्निंगसाठी वर्गखोल्याही विकसित करण्यात आल्या आहेत.
येथे नाविन्यपूर्ण आणि कृतियुक्त शिक्षणामुळे मुलं देखील आनंदाने अभ्यास करताना दिसत आहेत.
झारवड खुर्दच्या शाळेत विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. त्यापूर्वी विद्यार्थ्यांची भरपूर तयारी देखील करुन घेतली जाते.
वीज, पाणी, शौचालय, संरक्षक भिंत, मैदान, खेळणी, बेंच, पंखे अशा परिपूर्ण भौतिक सुविधा असल्याने विद्यार्थी आनंदाने प्रत्येक शालेय कार्यक्रमात सहभागी होतात.
या शाळेचा लोकसहभाग आणि श्रमदानातून कायापालट करण्यात आला आहे. या शाळेने अनके नवे उपक्रम सुरु केले आहेत. यापैकीच एक खास म्हणजे शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं जातं.
मुलांच्या शाळेतील पहिल्या पावलाची खूण म्हणून त्यांच्या पायांचे फर्शीवर ठसे घेत त्यांचं स्वागत होतं.
या शाळेने मागील सलग 4 वर्षांपासून कब्बडी, खो-खो, धावणे अशा तालुका स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेत घवघवीत यश मिळवलं आहे.
कृतियुक्त आणि आनंददायी शिक्षणासाठी शाळेने अनेक नवे मार्ग अवलंबले. इयत्ता 7 वीच्या स्कॉलरशिप परीक्षेतही या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत नाव आणलं.