Marathi News Photo gallery Aamir khan buys new apartment in same building where he owns nine flats actors real estate portfolio
ज्या इमारतीत आधीच 9 फ्लॅट्स, तिथेच आमिर खानने विकत घेतला कोट्यवधींचा अपार्टमेंट
अभिनेता आमिर खानने पाली हिल परिसरात कोट्यवधींचा अपार्टमेंट विकत घेतला आहे. विशेष म्हणजे याच इमारतीत आमिर खानचे नऊ फ्लॅट्स आहेत. रिअल इस्टेटमध्ये आमिरने चांगलीच गुंतवणूक केली आहे.
1 / 5
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अर्थात अभिनेता आमिर खानने नुकतंच मुंबईतील वांद्रे इथल्या पाली हिल परिसरात बेला विस्ता अपार्टमेंट्समध्ये एक नवीन आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. आमिरचा हा नवीन फ्लॅट रेडी-टू-मूव्ह-इन असून तो जवळपास 1027 चौरस फुटांवर पसरलेला आहे. याच इमारतीत आमिरचे इतर नऊ फ्लॅट्स आहेत.
2 / 5
आमिरने 9.75 कोटी रुपयांना हे नवीन अपार्टमेंट विकत घेतलं आहे. रिपोर्ट्सनुसार, आमिरची एकूण संपत्ती जवळपास 1862 कोटींच्या घरात आहे. आमिरने 25 जून रोजी नवीन अपार्टमेंट विकत घेतलं असून त्यासाठी 58.5 लाख रुपये स्टँप ड्युटी भरली होती.
3 / 5
'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'बेला विस्ता अपार्टमेंट्स'मध्ये 24 पैकी 9 युनिट्सचा मालक आमिर खानच आहे. याशिवाय मरिना अपार्टमेंट्समध्येही त्याचे फ्लॅट्स आहेत. आमिरचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ बराच मोठा आहे. बेला विस्ता आणि मरिना अपार्टमेंट्सशिवाय मुंबईतील कार्टर रोडजवळही त्याचं एक अपार्टमेंट आहे.
4 / 5
पंचगणीमध्येही आमिरचं एक फार्महाऊस आहे. उत्तरप्रदेशमध्येही त्याची बरीच प्रॉपर्टी आहे. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही त्याची संपत्ती आहे. अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये जवळपास 75 कोटी रुपयांचा मॅन्शन आहे.
5 / 5
'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटानंतर आमिरने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला आहे. तो लवकरच 'सितारें जमीं पर' या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. यामध्ये तो जिनिलिया देशमुख आणि दर्शिल सफारीसोबत भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.