आमिर खानची मुलगी इरा खान सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ती सोशल मीडिया सतत अॅक्टिव्ह असते. काही महिन्यांपूर्वीच तिचं मिशाल कृपलानीसोबत ब्रेकअप झालं. मात्र आता तिचं नाव नव्या व्यक्तीसोबत जोडलं जात आहे.
आता ती तिचा फिटनेस कोच नुपूर शिखरेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी नुपूर आणि इरा आमिरच्या फार्म हाऊसवर सुट्ट्यांचा आनंद लुटत होते. या ट्रीपचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इरा खान आणि मिशाल जवळजवळ दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
आता इरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा तर आहेच, मात्र या दोघांचे फोटो बघून चाहत्यांना या गोष्टीवरील विश्वास दृढ झाला आहे.