'आश्रम 3'च्या दुसऱ्या भागाचा प्रीमिअर महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी रोजी झाला. या वेब सीरिजच्या इतर सिझनप्रमाणेच हा नवीन भागसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला आहे. प्रेक्षकांना बाबा निरालाच्या भूमिकेतील बॉबी देओलचं अभिनय खूप आवडलंय.
या वेब सीरिजमधील आणखी एका भूमिकेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. ही भूमिका आहे पम्मीची. अभिनेत्री अदिती पोहणकरने या वेब सीरिजमध्ये पम्मीची भूमिका साकारली आहे.
अदिती पोहणकरचा जन्म 31 डिसेंबर 1994 रोजी झाला. अदितीचे वडील मॅरेथॉन धावपटू होते, तर आई राष्ट्रीय स्तरावरील माजी हॉकीपटू होती. 'आश्रम'शिवाय अदितीने 'लई भारी', 'जेमिनी गणेशनम सुरुली राजनम' यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलंय.
'टॉपप्लेनेटइन्फो'ने दिलेल्या माहितीनुसार 2019 पर्यंत अदितीची एकूण संपत्ती जवळपास 8 कोटी 75 लाख रुपयांच्या घरात होती. याशिवाय इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती जवळपास सहा ते नऊ लाख रुपयांपर्यंत कमाई करते.
'आश्रम'मध्ये अत्यंत साधेपणात दिसणारी अदिती खऱ्या आयुष्यात अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फोटो पहायला मिळतात. इन्स्टाग्रामवर तिचे 11 लाख फॉलोअर्स आहेत.