राज्यातील प्रमुख नेत्यांकडून सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या राज्यातील ग्रामीण भागांची पाहणी केली जात आहे. प्रमुख नेत्यांपाठोपाठ आता स्थानिक नेत्यांनीही शेतकऱ्यांना भेटून त्यांची परिस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोटार सायकलवरून फिरत अतिवृष्टीची पाहणी करायला सुरुवात केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिथे मोठ्या गाड्यांचा ताफा जाऊ शकत नाही अशा भागात अब्दुल सत्तार मोटार सायकल घेऊन प्रवास करत आहेत.
स्थानिक आमदार कैलास पाटील यांनी मोटारसायकल चालवली आणि अब्दुल सत्तार हे मोटारसायकलवरून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.
अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना धीर दिला.
मंत्री बाईकवरुन प्रवास करतानाचे हे दृश्य पाहायला स्थानिक लोक आणि प्रसारमाध्यमांची गर्दी झाली होती.