26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद (Mumbai Terrorist Attack) झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या जीवनावर ‘मेजर’ चित्रपटाचं टीझर (Major Teaser) नुकतंच लाँच करण्यात आलं.
या चित्रपटात आदिवी शेष मेजर संदीप यांची भूमिका साकारणार आहे. टीझर लॉन्चिंग इव्हेंटबद्दल बोलायचं झालं तर कोरोना परिस्थिती बघता हा सोहळा व्हर्च्युअली पार पडला. शिवाय बॉलिवूड, टॉलीवूड आणि मॉलिवूडमधील दिग्गज कलाकार त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंवरुन हा टीझर रिलीज करणार आहेत.
या चित्रपटासाठी आदिवनं मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे.
आदिवी त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना म्हणाला, संदीप उन्नीकृष्णन यांच्या कथेनं मी खूप प्रभावित झालो. मला आठवतंय की मी त्यांचा एक फोटो पाहिला होता जो सर्व चॅनेल्सवर दाखवला गेला होता. त्यांचा चेहरा पाहून ते मला माझ्या कुटुंबाचा भाग असल्यासारखे वाटले. नंतर मला कळलं की हे मेजर संदीप उन्नीकृष्णन आहेत ज्यांनी देशासाठी प्राण दिलेत.
मेजर चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे हे इनसीन फोटो खास तुमच्यासाठी.