बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा सतत रंगताना दिसत आहे.
आता नुकताच अभिषेक बच्चन हा काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी वाराणसी येथे पोहोचला आहे. यावेळी त्याच्यासोबत जया बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन या दिसल्या.
आता बच्चन कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र, या फोटोमध्ये ऐश्वर्या राय ही दिसत नाहीये. काशी विश्वनाथ मंदिरात बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्या गेली नाहीये.
हे फोटो व्हायरल होत असताना अनेकांनी विचारले की, ऐश्वर्या राय ही कुठे आहे? या फोटोनंतर परत एकदा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे.
ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्यासोबत राहत नसल्याचेही सांगितले जातंय. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चनचे घर सोडल्याचे सांगितले जात आहे.