अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच लग्न बेडीत अडकणार आहे. येत्या काही दिवसांत ती मेहुल पै याच्याशी विवाहबद्ध होणार आहे.
गेले अनेक दिवस अभिज्ञा तिच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. मात्र आता खऱ्या अर्थानं अभिज्ञाच्या घरी लगीन घाई सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिज्ञा भावेनं ही गोड बातमी दिली आहे.
'❤️शुभारंभ❤️'असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. '#toanewbeginning' असं हॅशटॅगही तिनं या पोस्टला दिलं आहे.
लग्नाच्या या कार्यक्रमाला अभिज्ञानं हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. महत्वाचं म्हणजे ही सुंदर साडी 'तेजाज्ञा' या अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडितच्या ब्रँडचीच आहे.