‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत साधी भोळी दिसणारी ‘लतिका’ खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.
अभिनेत्री अक्षया नाईकने मालिकेत ‘लतिका’ची भूमिका साकारली आहे.
अक्षया नाईक यापूर्वी हिंदी मालिकांमध्ये झळकली होती.
‘ढाई किलो प्रेम’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘ये रिश्ते है प्यार के’ या हिंदी मालिकांमध्ये अक्षया दिसली होती.
याशिवाय तिने ‘अनटॅग’ या वेब सीरीजमध्येही काम केले आहे.
सध्या छोट्या पडद्यावर अक्षया साकरात असलेली ‘लतिका’ प्रेक्षकांना अतिशय भावली आहे.