अभिनेत्री अमृता खानविलकरचे सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेहमीच पाहायला मिळतात.
नुकतेच अमृताने तिचे काही खास सेल्फी शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेय वाघने ‘सन किस्ड’ फोटोच्या टीप्स शेअर केल्या होत्या.
अमेयच्या या टिप्स फॉलो करत, अमृतानेही सन किस्ड सेल्फी फोटो क्लिक केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
अमेय वाघने अमृताच्या या फोटोंवर कमेंट करत तिला प्रतिक्रिया देखील दिली आहे.
या फोटोंमध्ये अमृताचा सुपर कूल अंदाज पाहायला मिळतो आहे.