प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर आता लवकरच पंजाबी संगीत क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे ती या व्हिडीओमध्ये फक्त अभिनयच करणार नाहीये तर या व्हिडीओची संकल्पनासुद्धा तिचीच आहे.
या गाण्याती निर्मितीसुद्धा दलजीत कौरच करणार असल्याची माहिती आहे. तर दलजीत सोबत उमर रियाझ हा अभिनेता नायक म्हणून रसिकांना भुरळ घालणार आहे. तर या गाण्याचे गायक जुगनी हे आहेत. एवढंच नाही तर या गाण्यातून शुभम गार्ग आणि वर्तिका हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
दलजीत अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे.
एवढंच नाही तर बिग बॉसच्या 13 व्या पर्वात तिनं उत्तम टास्क पूर्ण करत चाहत्यांचं मन जिंकलं होतं.