जुन्या ट्विटवरून ट्रोल करणाऱ्यांना गिरिजा ओकने सुनावलं; म्हणाली, आपल्याकडे ते मान्यच करत नाही
Actress Girija Oak Godbole on opinion : गिरिजा ओक गोडबोले वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. आताही तिने मतांच्या बदलण्यावर आपलं मत मांडलं आहे. एका मुलाखती दरम्यान तिने यावर आपलं म्हणणं मांडलं आहे. गिरिजा ओक नेमकं काय म्हणाली? वाचा सविस्तर......
तुमचं आधीचं मत चांगलं होतं. आता ते तितकंस चांगलं नाही. तुमचं आधीचं मत अधिक चांगलं असेल. पण तुमच्या मतामध्ये बदल झाला हे महत्वाचं नाही का? त्याला महत्व दिलं गेलं पाहिजे, असं गिरिजा म्हणाली.
Follow us
अभिनेत्री गिरिजा ओक ही परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मतं मांडत असते. आताही तिने अशाच एका विषयावर एका मुलाखती दरम्यान आपलं परखड मत मांडलं आहे.
आधी मला असं वाटायचं पण आता मला असं नाही वाटत हे आपल्याकडे मान्यच केलं जात माही. आधी असणारं मत बदललं याचा अर्थ तुमच्यात बदल झाला. तुम्ही प्रगती केली आहे, असं गिरिजाने सांगितलं.
तुमचं आधीचं मत चांगलं होतं. आता ते तितकंस चांगलं नाही. तुमचं आधीचं मत अधिक चांगलं असेल. पण तुमच्या मतामध्ये बदल झाला हे महत्वाचं नाही का? त्याला महत्व दिलं गेलं पाहिजे, असं गिरिजा म्हणाली.
जुने ट्विट काढून लोकांना ट्रोल केलं जातं ते चूक आहे. त्यापेक्षा तो माणूस आता काय बोलतो हे जास्त महत्वाचं नाही का? अशावेळी आपण मान्य केलं पाहिजे की त्याच्या मतात बदल झाला आहे, असं गिरिजा ओकने म्हटलं.
आधी मला वाटायचं की मी फार महत्वाची आहे. पण आता तसं नाही वाटत, याला अॅसेप्ट केलं पाहिजे. काल मी काही तरी बोलत होते. आज वेगळं बोलतेय. पण उद्या आणखी काही वेगळं बोलू शकते, हे मान्य केलं जात नाही, असं गिरिजा म्हणाली.