Photos | अभिनेत्री काजलचं हनीमून अंडरवॉटर व्हिलात, एक रात्र थांबण्याची किंमत तब्बल…
अभिनेत्री काजल अग्रवाल तिच्या लग्नानंतर चांगलीच चर्चेत आहे. सध्या तिच्या हनीमूनचे फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काजल हनीमूनसाठी मालदीवला गेली आहे. येथे ते दोघे एका अंडरवॉटर व्हिलामध्ये थांबले आहेत.
Follow us
अभिनेत्री काजल अग्रवाल तिच्या लग्नानंतर चांगलीच चर्चेत आहे. सध्या तिच्या हनीमूनचे फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काजल हनीमूनसाठी मालदीवला गेली आहे. येथे ते दोघे एका अंडरवॉटर व्हिलामध्ये थांबले आहेत.
मालदीवमधील या अंडरवॉटर व्हिलाचं नाव ‘द मुराका’ असं आहे. हा व्हिला प्रचंड सुंदर मात्र तितकाच महागडा आहे. या ठिकाणी एक रात्र थांबण्यासाठीची किंमतही अवाक करणारी आहे.
या व्हिलामध्ये एक रात्र थांबण्यासाठी तब्बल 50 हजार डॉलर (भारतीय रुपयांमध्ये 37 लाख 7 हजार 110 रुपये) खर्च करावे लागतात. या हॉटलच्या निर्मितीसाठी 15 मिलियन डॉलर खर्च आल्याचंही सांगितलं जातं.
द मुराका व्हिला हे जगातील पहिला अंडरवॉटर हॉटल व्हिला आहे. हे समुद्रात 16 फूट पेक्षा अधिक खोल आहे आणि त्याच्या भिंती काचेच्या आहेत.
काचेच्या भिंती असल्याने या व्हिलातून समुद्राच्या पाण्यातील माशांसह प्रत्येक जीव स्पष्टपणे दिसतो. हा व्हिला 2018 मध्ये सुरु झाला होता. हा व्हिला कोनार्ड मालदीव्स रंगाली बेटाचा भाग आहे.
हा व्हिला बनवण्यासाठी स्टील, सिमेंट काँक्रीट आणि एक्रेलिकपासून बनवण्यात आलाय. यात जिम आणि प्रायव्हेट सिक्युरिटी डिटेल्ससाठी देखील व्यवस्था आहे. संपूर्ण व्हिला अत्यंत सुंदर बनवण्यात आलाय.
काजल अग्रवालने शेअर केलेल्या हॉटेलमधील फोटोंमध्ये माशांसह समुद्रातील इतर जीव सहजपणे दिसत आहेत. या फोटोंमध्ये काजल आपला पती गौतम सोबत दिसत आहे. यात बेडरुमचीही झलक पाहायला मिळते आहे.
काजलने 30 ऑक्टोबर रोजी आपला बॉयफ्रेंड गौतम किचलू याच्यासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये लग्न केलं.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या लग्नात खूप मोजक्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यात केवळ कुटुंबियांचा समावेश होता.
काजलच्या पतीचं पूर्ण नाव गौतम किचलू असून तो एक उद्योजक आहे. गौतम किचलू यांची कंपनी फर्नीचर, डेकोर आयटम्स, पेंटिंग्स आणि अन्य हाऊसहोल्ड साहित्य विक्री करते.
काजलविषयी बोलायचं झालं तर काजल दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सिंघम चित्रपटातून बॉलिवूडमध्येही तिने आपली ओळख निर्माण केलीय.