
अभिनेत्री क्रिती सेन तिच्या दमदार अभिनयामुळे इंडस्ट्रीत स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच क्रिती सेन तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते.

क्रिती ही त्या ग्लॅमरस अभिनेत्र्यांपैकी एक आहे. जी स्वतःच्या फॅशन स्टेटमेंटवरती कायम प्रयोग करताना दिसते. एवढंच नव्हे तर तिचे हे प्रयोग चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहे

क्रितीचा मैत्रिणीच्या लग्नातील घातलेला शरारा लूक चर्चेत आला आहे, तिने तिच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या फंक्शनसाठी हा लूक कॅरी केला होता. तिचा लुकसोबतच डान्सचा व्हिडिओही खूप व्हायरल झाला आहे.

अलीकडेच, क्रितीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती फिकट गुलाबी रंगाचा सुंदर शरारा सेट परिधान करताना दिसत आहे.

या पोस्टमध्ये क्रितीने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिची बहीण नुपूर सेन आणि आई दिसत आहेत.

क्रिती सेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या सोबत बहीण नुपूर सेनही डान्स करताना दिसून आली आहे.

क्रितीने या आऊटफिटवर अनेक अंगठ्या, बांगड्या, सुंदर हार आणि लहान बिंदी घातलेली तसेच यावर तिने हलकासा मेकअप केला आहे.