अभिनेत्री मानसी नाईक नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, मात्र सध्या चर्चा तिच्या गाण्याची किंवा चित्रपटाची नसून तिच्या खासगी आयुष्याबद्दल आहे.
मानसी नाईकनं बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत साखरपुडा केला आहे.
मराठी आयटम गाण्यांमुळे आणि चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेली मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
आता तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ही खास बातमी चाहत्यांना दिली आहे.
सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटोसुद्धा तिनं शेअर केले आहेत.
गेले अनेक दिवस या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होती. मात्र आता हे दोघं लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
'वाट पाहतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' अशा विविध आयटम गाण्यांमुळे तिनं अनेकांवर भूरळ घातली होती. आजही तिचे लाखो चाहते आहेत.