मानसीनं तिच्या या वाढदिवसाला सोशल मिडीयावर प्रेमाची कबुली दिली आहे. प्रदीप खरेरासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिनं सगळ्यांना सांगितलं.
तेव्हापासून सोशल मिडीयावर या कपलची जोरदार चर्चा रंगली. नोव्हेंबर महिन्यात दोघांनी साखरपुडा देखील केला आहे.
मानसीनं आता लग्नाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिनं प्रदीपसोबतचा फोटो शेयर करत वधू बनण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगतंय. सोबतच तिनं लग्नाचा काउंटडाऊनही सुरू केला आहे.
मात्र मानसीनं लग्नाची तारीख अजून जाहिर केलेली नाही. त्यामुळे या लग्नाकडे अनेकांचं लक्ष असेल यात शंका नाही.
मानसी उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. तर प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. दोघंही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.