अभिनेत्री मीनाक्षी राठोड लवकरच आई होणार असून , ती आपलया मातृत्व अवस्थेचा परिपूर्ण आनंद घेताना दिसत आहे मीनाक्षीने नुकतेच आपल्या बेबीबंप सोबत बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो शूट केले आहे.
मीनाक्षी तिच्या व्यावसायिक आयुष्यात 'सुख म्हणजे नक्की काय' या मालिकेतील देवकीच्या भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिकाही चाहत्यांच्या चांगलीच पंसतीस उतरली आहे.
या अवस्थेतही स्वतः ला कार्यरत ठेवण्याचा सकारात्मक पायंडा मीनाक्षीनं घातला आहे. यापूर्वही तिने आपल्या मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर केला होता. त्याला वर्किंगमॉम असा हॅशटॅग वापरला होता.
ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काढलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेता. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच मीनाक्षीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती आई होणार असल्याची माहिती दिली होती. मीनाक्षीने पतीनं अभिनेता कैलास वाघमारेसोबत हे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शूट केलं आहे.