अभिनेत्री पूजा बत्रा (Pooja batra) आपल्या योगाने आपल्या दिवसाची सुरुवात करते. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि दररोज आपले योगा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मंगळवारी अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एकदम फिट दिसत आहे.
या फोटोत आपण पाहु शकता की, पूजा हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची बिकीनी परिधान करून योग करताना दिसत आहे. पूजा पूलच्या बाजूला बिकिनीमध्ये योगा करताना दिसत आहे. तिचा हा फोटो चाहत्यांमध्ये खूपच चर्चेत आला आहे.
तिचे चाहते या फोटोला भरपूर प्रतिसाद देत आहेत. एका वापरकर्त्याने "वंडरफुल ट्रान्सफॉर्मेशन" अशी टिप्पणी केली, दुसर्या वापरकर्त्याने लिहिले की, "वयाच्या 44 व्या वर्षीही तुम्ही खूप तंदुरुस्त आणि सुंदर दिसता", या व्यतिरिक्त इतर वापरकर्त्यांनी हार्ट इमोटिकॉन पोस्ट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वयाच्या 44व्या वर्षीही या अभिनेत्रीने स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे. ती तिच्या इंस्टाग्रामवर बर्याच वेळा आपल्या वर्कआउट्सचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
पूजा बत्रा आपल्या फोटोंमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे ती चर्चेचा विषय बनली होती.
पूजाने तिच्या कारकीर्दीतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जसे की, ‘हसीना मान जाएगी’, ‘कभी प्यार ना हो जाए’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘जोडी नंबर 1’, ‘नायक’ आणि असे बरेच चित्रपट या यादीमध्ये समाविष्ट आहेत. चित्रपटांमध्ये तिच्या भूमिकेचे खूप कौतुक देखील झाले.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, 2019 मध्ये पूजा बत्राने लग्नगाठ बांधत सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने तिचा प्रियकर नवाब शाह याच्याशी लग्न केले आहे. त्यानंतर तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. नवाब शाह ‘दबंग 3’, ‘मुसाफिर’, ‘लक्ष्य’, ‘डॉन 2’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘दिलवाले’ यासारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात काम केले आहे.