अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.
उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.
आता पूजानं ग्लॅमरस अंदाजात फोटो शेअर केले आहेत. निळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये पूजा प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
पूजा सध्या 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर'या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. या शो दरम्यान पूजाचं हे ग्लॅमरस लूक पाहायला मिळतंय.