अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधते. आता तिचा हा लूकसुद्धा तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.
चित्रपट, मालिका आणि युट्यूब बॉग्जच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही सतत फोटो पोस्ट करत असते.
इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर प्राजक्ताचे अनेक चाहते आहेतच मात्र युट्यूबवरसुद्धा तिचे 23 हजारांपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत.
युट्यूबच्या माध्यमातूनसुद्धा ती चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असते. वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत व्यक्त करत असते.
तिनं या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.