'टकाटक' या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.
आता प्रणालीनं साडीमध्ये एक खास फोटोशूट केलं आहे.
अस्सल मराठमोळा पेहराव आणि चेहऱ्यावरील निरागस भाव यामुळे तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस आले आहेत.
'टकाटक' या चित्रपटात उत्तम अभिनय करत तिनं मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे.
ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्गसुद्धा मोठा आहे.