आभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट करतेय आणि तिचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना चांगलेच पसंतीस सुद्धा येत आहेत.
पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून समुद्र किनाऱ्यावरून फेरफटका मारतानाच प्रार्थनाचा हा लूक अधिकच किलर ठरत आहे.
निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात तिचे अनेक चाहते आहेत.
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.
'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे.
फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा प्रार्थनानं दमदार अभिनय केला आहे.