बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी अनेक मोठी नावे समोर आली आहेत. या प्रकरणात आता‘संकटमोचन महाबली हनुमान’ या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रीतिका ड्रग्ज तस्कराकडून ड्रग्ज विकत घेत असताना तिला एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.
प्रीतिका चौहानच्या घरी 24 ऑक्टोबरला एनसीबीने छापेमारी केली होती. ज्यामध्ये एनसीबीच्या हाती भक्कम पुरावे लागल्याने तिला अटक करण्यात आली आहे.
आज तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यापूर्वी एनसीबी टीमने तिला मेडिकल टेस्टसाठी नेलं होतं.