बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक बड्या कालाकांरांची नावे या प्रकरणात समोर आली आहेत. रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खाननंतर अभिनेत्री सपना पब्बीला देखील एनसीबीने समन्स बजावला होता.
सपना पब्बी सुशांतच्या ‘ड्राईव्ह’ चित्रपटाची सह-अभिनेत्री होती. एनसीबीच्या समन्सनंतर ती फरार झाल्याचे वृत्त समोर येत होते.
आता खुद्द सपनाने आता सोशल मीडियावर पोस्ट लिहीत याबद्दलचा खुलासा केला आहे.
‘भारतात माझ्याबाबतीत सुरू असलेल्या चर्चांमुळे मी खूप अस्वस्थ झाले आहे. मी फरार झाले आहे, या अफवेमुळे मला प्रचंड दुःख झाले आहे. मी माझ्या घरी, लंडनला माझ्या परिवाराजवळ परतले आहे. माझ्या वकिलांची अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, मी कुठे आहे हे त्यांना माहित आहे,’ असं तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अभिनेत्री सपना पब्बी ही ब्रिटीश नागरिक असून अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी ती भारतात आली होती.