शहनाजने यापूर्वी तिच्या व्यक्तिमत्त्वावर बरेच काम केले आहे. तिची वेगळी स्टाइल चाहत्यांना खूप आवडते. शहनाजचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत आणि त्यांना 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Photo : Instagram)
पंजाबी इंडस्ट्रीत शहनाजचे मोठे नाव आहे, यासोबतच ती आता बॉलिवूडमध्येही अनेक प्रोजेक्ट्स करत आहे. याशिवाय ती म्युझिक व्हिडिओही करत आहे. 'किसी का भाई किसी की जान' जरी अयशस्वी झाला असला तरी शहनाजला या प्रोजेक्टचा खूप फायदा झाला आहे.
लाल फ्रॉकमध्ये बीचवर शहनाजची ही स्टाइल लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. चाहते तिच्या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. एका चाहत्याने लिहिले 'कोई एक एसी चला दो यार.'
शहनाज गिल गेल्या काही दिवसांपासून व्हेकेशन एन्जॉय करत आहे. याआधीही तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत. एका चाहत्याने 'उन्हाळ्यात उष्णता वाढतेय' असे सांगितले.
'मी निसर्गाच्या जवळ असताना माझे सर्वोत्तम क्षण जगते ' अशी कॅप्शन शहनाजने लिहीली आहे. शहनाजच्या यापूर्वी शेअर केलेल्या फोटोंना 12 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.