अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'डान्सिंग क्विन'च्या सेटवर धमाल करताना दिसली, सोबतच या पर्वात तिनं रोज नवनवीन फोटोशूटसुद्धा केले.
आता 'डान्सिंग क्विन'च्या ग्रँड फिनालेला तिनं जबरदस्त डान्स केला आहे. या जबरदस्त लूकचे काही फोटोही तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोनालीचा लूक चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे. तिचा हा डान्सिंग अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
सोनालीनं 'डान्सिंग क्विन'च्या सेटवर 'अप्सरा आली'या गाण्यावर डान्स केलाय.
पुण्याची ‘प्रणाली चव्हाण’ही या पहिल्या वजनदार पर्वाची विजेती ठरली.