अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे स्टायलिश फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. चाहते देखील त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लक्ष ठेवून असतात आणि ते तिच्या बोल्डनेसचे खूप कौतुक करतात. सुष्मिता पुन्हा एकदा तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
सुष्मिता सेनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती स्कुबा डायव्हिंग करताना दिसत आहे. रंगीबेरंगी मासे पाण्यात पोहताना दिसतात. तिचा हा व्हिडिओ शेअर करत सुष्मिताने एक लांबलचक नोट लिहिली आहे.
सुष्मिता सेनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने 'माझे विश्व!' असे कॅप्शन दिले आहे. मी वर्षातून एकदा तरी माझ्या मुलींसोबत मालदीवला जाते असे तिने म्हटले आहे.
शांततेचा आनंद घ्या. I love you guys beyond!!! #happyweekend #duggadugga असे तिने म्हटले आहे.
सुष्मिता सेनच्या या पोस्टवर टिप्पणी करताना मुलगी रेनी सेनने लिहिले, 'किती संस्मरणीय अनुभव होता. मला हे नेहमी लक्षात राहील! पाण्याखालील सुंदर जगाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद आई. मी तुझ्यावर प्रेम करते .