अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा ‘तेजाज्ञा’ हा क्लोथिंग ब्रँड नेहमीच चर्चेत असतो. तेजस्विनी आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे या दोन अभिनेत्रींनी मिळून हा ब्रँड सुरु केला आहे.
याच तेजाज्ञा कलेक्शनमधील विविध फोटो तेजस्विनी सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तेजस्विनीने मराठमोळा लूक असलेले फोटो शेयर केले आहेत.
या फोटोत तेजस्विनीने ब्राऊन रंगाची साडी नेसली आहे. शिवाय नाकात मराठमोळी नथ देखील आहे.
खणाच्या या साडीत तेजस्विनी खूपच सुंदर दिसत असून, तिने या फोटोला ‘नथीचा नखरा’ असं कॅप्शनही दिलंय.
एवढंच नाही तर या खणाच्या साडीच्या पदरावरही नथीची आकृती पाहायला मिळतेय.