वन डे वर्ल्ड कप तोंडावर असताना अफगाणिस्तान संघाचा खेळाडू नवीन उल हक याने निवृत्तीबाबत घोषणा केली आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी नवीनने निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
अफगाणिस्तान संघाच्या वर्ल्ड कप संघात निवड झाल्यावर त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. यंदाचा वर्ल्ड कप खेळून नवीन वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.
नवीन याने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीबाबतची घोषणा केली आहे. पोस्टमध्ये, मला माझ्या देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली मोठी गोष्ट आहे. या वन डे वर्ल्ड कपनंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. आता पुढे टी-20 क्रिकेट सुरू ठेवणार असल्याचं नवीन म्हणाला.
नवीनच्या निर्णयाने सर्वजण गोंधळात पडले असून त्याने आपल्या पोस्टमध्ये आपण फक्त वन डे क्रिकेटमधून निवृत्त होत असून टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहोत, असं नवीन म्हणाला आहे.
विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात आयपीएलमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला होता. बंगळुरू आणि लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासूव नवीन चर्चेत आला. याआधी त्याचा शाहिद आफ्रिदीसोबतही वाद झाला होता