सध्या ज्या उद्योजकाची चर्चा रंगली आहे त्याचं नाव साबीर भाटिया असं आहे. जो सध्या AI वर काम करत आहे आणि क्लीन फॅनॅटिक्सचा सह-संस्थापक देखील आहे. साबीरने 4 जुलै 1996 रोजी जॅक स्मिथसोबत हॉटमेलची सह-स्थापना केली. साबीरने 1998 मध्ये बिल गेट्स यांना 3300 कोटी रुपयांना हॉटमेल कंपनी विकली.
बिल गेट्स यांना कंपनी विकल्यामुळे साबीर तुफार चर्चेत आला आणि त्याच्या नावाची चर्चा ऐश्वर्या हिच्यासोबत रंगू लागली. रिपोर्टनुसार सबीर याने ऐश्वर्या सोबत लग्न करण्याची देखील इच्छा व्यक्त केली.
ऐश्वर्याचा 'ताल' सिनेमा पाहिल्यानंतर उद्योजकाने अभिनेत्रीचं कौतुक केलं. त्याचं मुलाखतीत ऐश्वर्यासोबत लग्न करण्याची इच्छा सबीर याने व्यक्त केली. दरम्यान सलमान आणि साबीर यांची भेट 2001 मध्ये एका पार्टीत झाली.
तेव्हा साबीर आणि ऐश्वर्या यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. तेव्हा पार्टीत सलमानने सबीरला विचारलं, 'तर तू तोच आहेस का... ज्याने ऐश्वर्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली..'
यावर सबीर म्हणाला, 'हो... ऐश्वर्या एक चांगली मुलगी आहे.' दरम्यान पार्टीत सबीर एका महिलेसोबत फोटो क्लिक करत होता. तेव्हा सलमान देखील त्यांच्यामध्ये आला.
तेव्हा चुकून सलमानने साबीरच्या हातावर सिगरेट पाडली आणि करोडपतीला चटका लागला. यावर सलमानने माफी मागितली आणि म्हणाला, "अरेरे, अखेर ऐश तुला भेटलीच...'
ऐश्वर्या हिच्याशिवाय साबीर याच्या नावाची चर्चा अमीषा पटेल आणि सुष्मिता सेन यांच्यासोबत रंगली. पण 9 मार्च 2008 मध्ये साबीर याने लहानपणीची मैत्रीण तान्या शर्मा हिच्यासोबत लग्न केलं. पण काही वर्षांनी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.