Nysa Devgan Photo : अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगण हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये न्यासा पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे.
कायम वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणाऱ्या न्यासाचे पारंपरिक लूकमध्ये काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये न्यासा प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र न्यासाच्या फोटोंची चर्चा आहे.
न्यासाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी, न्यासा कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर न्यासाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर न्यासाने अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
स्टारकिड्स म्हणून न्यासा प्रचंड प्रसिद्ध असते. शिवाय मित्रांसोबत पार्टी करताना न्यासाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता न्यासाच्या पारंपरिक लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
खुद्द न्यासाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिच्या पारंपरिक लूकवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. शिवाय अनेकांनी न्यासाची तुलना आई काजोल हिच्यासोबत केली आहे.