अकोला : सोशल मीडिया हे फार मोठं जाळं बनलं आहे. हे जग अभासी जरी असलं तरी लाखो लोकांच्या भावना आता या जगाशी गुंतल्या गेल्या आहेत. लाखो लोक याच जगातून एकमेकांना भेटले. अनेकांची मैत्री झाली, अनेकांचे भांडणं झाले, तर अनेकांना जोडीदारही याच जगाने दिले. या जगात आता लोकांची वाढती संख्या लक्षात घेऊन चोरट्यांनी आता आपल्या चोरीचं स्वरुपही बदललं आहे. घरफोडी किंवा पाकिट मारी सारख्या चोऱ्या या क्षुल्लक झाल्या आणि सायबर क्राईम हा मोठा गुन्हा या जगतात आला. काही नराधम सोशल मीडियावर साध्या-भोळ्या युजर्सला फसवतात. पैसे दुप्पट-तिप्पट करुन देण्याचं आमिष देतात. त्यानंतर गायब होतात. असाच काहिसा प्रकार अकोल्यात समोर आला आहे.