Mohammed Zubair : आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी अल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेरला अटक ; काय आहे प्रकरण?

| Updated on: Jun 28, 2022 | 11:50 AM

अल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांना सोमवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलच्या IFSC युनिटने अटक केली. जुबेरला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

1 / 5
अल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांना सोमवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलच्या IFSC युनिटने अटक केली. जुबेरला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या एक दिवसाच्या पोलिस कोठडीच्या अर्जाला परवानगी दिली आहे.

2 / 5
जुबेरवर एका विशिष्ट धर्माच्या भावना भडकावल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. IFSC पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी चौकशीत सहकार्य करत नसल्याने  पोलीस कोठडीची  मागणी   करण्यात आली आहे.

3 / 5
स्पेशल सेलच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात ट्विटर हँडलवरून तक्रार मिळाल्यानंतर मोहम्मद जुबेरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहम्मद जुबेरने जाणूनबुजून विशिष्ट धर्माच्या देवाचा अपमान करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह छायाचित्र पोस्ट केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्याच्या  ट्विट रिट्विट केले जात होते. त्यांचे फॉलोअर्स आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली होती.

4 / 5
आरोपींविरुद्ध कलम 153(वातावरण बिघडवण्याची आणि उपद्रव निर्माण करण्याची शक्यता) आणि कलम 295 (कोणत्याही समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या वस्तूचा अपमान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 / 5
आरोपी चौकशीत सहकार्य करत नाही. तसेच मोबाईल आणि लॅपटॉप देत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोबाईल आणि लॅपटॉप तपासल्यानंतर आरोपीने हे वादग्रस्त ट्विट कधी केले आणि आतापर्यंत किती ट्विट केलेहे कळण्यास मदत होईल.