नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
छान छान फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे प्रियाला पसंत आहे.गेले काही दिवस ती सतत तिचे फोटोशूट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे.
आता तिनं एक ट्रेडिशनल फोटोशूट केलं आहे. 'This wedding season' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
काळ्या आणि गुलाबी रंगाच्या या साडीत प्रिया अधिकच सुंदर दिसत आहे.
या साडीसोबत प्रियानं हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे. त्यामुळे या साडीला आणखी लूक आला आहे.