नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित फँड्री (Fandry) चित्रपटातील जब्या-शालूची (Jabya Shalu) अनवट प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सिनेमा रिलीजनंतर जितकी गाजली नव्हती, त्यापेक्षा जास्त ती सध्या सोशल मीडियावर भाव खाऊन जात आहे.
इन्स्टाग्राम, फेसबुकवरील फोटोंमुळे राजेश्वरी चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर फोटो शेअर केल्यानंतर त्यावर लाईक्स आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडतो.
तिच्या प्रत्येक फोटोवर हजारोच्या संख्येने कमेंट्स असतात. तर लाईक्सचा आकडाही सहज सत्तर हजारांच्या दिशेने धाव घेतो. त्यात लव्ह रिअॅक्शन्सचा भरणा अधिक असतो, हे वेगळं सांगायला नकोच.
राजेश्वरी खरातच्या फोटोवर कमेंट्सचा महापूर येतो. राजेश्वरीच्या लूक्सचं कौतुक करणाऱ्या चारोळ्याही त्यामध्ये असतात. विशेष म्हणजे त्यापैकी काही कमेंट्सना राजेश्वरी स्वतः उत्तरही देते.
नुकतंच गुढीपाडवा पार पडलाय. गुढीपाडव्याला हा सुंदर फोटो शेअर करत तिनं चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एवढंच नाही तर शालूनं आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खास अभिवादन करतानाचा फोटोसुद्धा शेअर केला होता.