ढोल, टिमक्याच्या तालावर आदिवासी बांधव नृत्य करतात. गोंडी नृत्य करताना त्यांच्यात दोन लोकांजवळ कापडाची झोळी घेऊन बक्षीस मागणारे असतात. वर्षभर जनावरे चारल्यामुळे वर्षातून एकदा आपला हक्काने बक्षिसांचा स्वीकार करतात. यात रोख रकमेसह जे काही दुकानातील सामान दिले जाते, त्याचा स्वीकार प्रेमाने केला जातो.
Follow us
अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात दिवाळीनंतरचा घुंगरु बाजार हा सर्वात मोठा सण साजरा करताना आदिवासी बांधव पायात घुंगरु बांधून बासरी व ढोलकीच्या तालावर प्रत्येक आठवडी बाजारात जाऊन नृत्य करुन दीपोत्सवाचे स्वागत करतात.
मेळघाटात फार पूर्वीपासून कोरकू, गोंड, भिलाल या आदिवासी जमाती वास्तव्य करीत आहेत. शहरी संस्कृतीपासून लांब राहणाऱ्या या आदिवासी बांधवांनी आपली स्वतंत्र परंपरा व संस्कृती जतन केली आहे.
ढोल, टिमक्याच्या तालावर आदिवासी बांधव नृत्य करतात. गोंडी नृत्य करताना त्यांच्यात दोन लोकांजवळ कापडाची झोळी घेऊन बक्षीस मागणारे असतात. वर्षभर जनावरे चारल्यामुळे वर्षातून एकदा आपला हक्काने बक्षिसांचा स्वीकार करतात. यात रोख रकमेसह जे काही दुकानातील सामान दिले जाते, त्याचा स्वीकार प्रेमाने केला जातो.
मेळघाटातील धारणी येथे यंदाचा घुंगरु बाजार भरला होता. आदिवासी समाजातील पुरुष मंडळी पारंपारिक पोषाखात घुंगरु बाजारात येतात. पांढरा सदरा, पांढरी धोती, काळा कोट, डोक्यावर काळा चष्मा, हातात काठी, बासरी आणि डोक्यावर तुरेदार पगडी हा त्यांचा पोषाख विशेष आकर्षण ठरतो.
सातपुड्याच्या शेवटचे टोक म्हणजे मेळघाट. 70 टक्क्यांहून अधिक वन असलेल्या मेळघाटात पुरातन काळापासून आदिवासींच्या विविध जमाती वास्तव्यास आहे. शहरी संस्कृतीपासून लांब राहणाऱ्या या आदिवासी बांधवांनी आपली ओळख जपलीये.
घुंगरु बाजाराची आदिवासी मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. मोठ्या उत्साहाने आम्ही हा सण साजरा करतो. आम्हा आदिवासी बांधवांची संस्कृती टिकून राहावी असं आम्हाला वाटतं, अशा भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या.