आता मोटिव्हेशनल कोट शेअर करत अमृता यांनी फोटो शेअर केले आहेत.
अमृता फडणवीस यांच्या नावाच्या चर्चेचं नवं कारण ठरलंय त्याचं नवं फोटोशूट!
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
त्या नेहमीच नवनवीन अंदाजात फोटो शेअर करत असतात.
हा सुंदर फोटो शेअर करत त्यांनी ‘लवकरच सादर करत आहोत...जुनीच जादू नव्या प्रेमासह.. फक्त तुमच्यासाठी..’ अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
तेव्हा आता ही त्यांच्या नव्या गाण्याची झलक आहे की नवं सरप्राईज याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.