मकर संक्रांती हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं त्यामुळे तुमचे लाडके कलाकार आता काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये फोटोशूट करत आहेत.
आता अभिनेत्री अमृता खानविलकरनं एक खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
अमृतानं ही काळी साडीसुद्धा उत्तम प्रकारे कॅरी केली आहे. काळ्या रंगाच्या या साडीवर ब्राऊन रंगाचे शेड्स आहेत. सोबतच तिनं ऑक्सिडाइज ज्वेलरीसुद्धा कॅरी केली आहे.