प्रत्येकजण येत्या नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत गुंतले आहेत. सगळीकडे नव वर्षाच्या पार्टीची तयारी सुरु आहे.
नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीत यावेळी काही हटके लूक ट्राय करण्याचा विचार करत असाल तर, अनन्या पांडेच्या या लूक्समधून प्रेरणा घेऊ शकता.
अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. अनन्या तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
अनन्या स्क्वीन आणि ऑफ-शोल्डर ड्रेसला अधिक प्राधान्य देताना दिसते. विशेष म्हणजे या ड्रेससह आपल्याला कमीतकमी दागिने आणि मेकअपची आवश्यकता भासते.
जर आपल्याला नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये हलका आणि ग्लॅमरस ड्रेस घालायचा असेल तर, अनन्याचा हा लाल ड्रेस आपल्या पार्टी थीमसाठी योग्य आहे. आपण नवीन वर्षाच्या पार्टीत अनन्याचा लाल शॉर्ट ड्रेस वापरुन पाहू शकता.
या व्यतिरिक्त आपण या आउटफिट्ससह पफरी जॅकेट किंवा ओव्हरकोट टीमअप करून पाहू शकता. शिवाय या लूकसह हाय बूट्स घालू शकता शकता. थंडीपासून बचाव करण्याबरोबरच हे बूट आपल्याला स्टायलिश लुक देतात.