सध्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेती मशागतीला वेग आला आहे शेतात नांगरणी करणे, रोटा व्हिटर फिरवणे ईत्यादी प्रकारची मशागती करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. धुळ्यातील रामी (ता. शिंदखेडा) येथील रामा वेडू माळी यांच्या मालकीच्या शेतात मशागत करताना प्राचीन मुकूट सापडला.
हा मुकूट पंचधातूचा असून दोन हजार वर्ष जुना असल्याची माहिती समोर आली आहे. दिगंबर माळी यांना हा मुकूट जमिनीत दिसला. त्यानंतर हा मुकूट बाहेर काढण्यात आला.
दोंडाईचा येथील जैन बांधवांनी मुकुटाची पाहणी केली त्यांच्या माहितीनुसार ते 2000 वर्षापूर्वीचा पंचधातू मुकूट असल्याचे सांगितले.
मुकुट सापडल्याची माहिती अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ दखल घेत मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री यांच्यामार्फत पुरातत्व विभागाला कळविण्यासाठी पंचनामा करण्यात आला.
मुकुटाचा पंचनामा करून तो पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला. सदर माहिती पुरातत्त्व विभागाला कळविण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी दिली.