अनिल कपूर यांच्याविनाच पत्नी गेली होती हनिमूनला, 10 वर्ष डेटिंग केल्यावर अभिनेत्याने केले लग्न…

| Updated on: May 19, 2023 | 12:53 PM

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता कपूरसोबत यांच्या लग्नाचा आज ३९ वा वाढदिवस आहे. या दोघांची जोडी बॉलिवूडच्या यशस्वी जोडींपैकी एक आहे.

1 / 5
 अनिल कपूरने 19 मे 1984 रोजी सुनीता कपूर यांच्यासोबत लग्न केले. पण लग्नाआधी दोघेही 10 वर्षे एकमेकांना डेट करत होते. अनिल आणि सुनीता कपूर यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात एका प्रँक कॉलने झाली होती. अनिलच्या मैत्रिणीने सुनीतावर प्रँक करण्यासाठी तिला अनिल यांचा नंबर दिला होता. (Photo : Instagram)

2 / 5
सुनीताचा आवाज पहिल्यांदा ऐकून अनिल त्यांच्या प्रेमात पडले होते. यानंतर दोघांची भेट होऊ लागली आणि हळूहळू भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. अनिल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, दोघेही त्यांच्या आयुष्यात संघर्ष करत असताना आणि सुनीता मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावत असताना ते भेटले. अनिल यांच्याकडे त्यावेळी टॅक्सीचे भाडे भरण्यासाठीही पैसे नव्हते, पण सुनीता यांनी त्यांना खूप मदत केली.

3 / 5
मला खूप मेहनतीनंतर चित्रपट मिळू लागले होते, ज्यामध्ये भूमिकाही उत्कृष्ट होत्या, असे अनिल म्हणाले.  “मला माझा पहिला ब्रेक 'मेरी जंग' चित्रपटात मिळाला. तेव्हा वाटलं आता घरही घेता येईल आणि स्वयंपाकघरही येईल, आता लग्न करता येईल.

4 / 5
"त्यानंतर मी सुनिताला फोन केला आणि म्हणालो, उद्या लग्न करू . कारण उद्या नाही तर कधीच नाही." 17 मे 1984 रोजी अनिल कपूर यांनी मेरी जंग हा चित्रपट साइन केला. 18 मे रोजी त्यांनी सुनीताला प्रपोज केले आणि 19 मे रोजी दोघांचे लग्न झाले.

5 / 5
मात्र लग्नानंतर लगेचच अनिल शूटिंगसाठी गेले होते. ते म्हणाले, "लग्नानंतर मी 3 दिवस शूटिंगला गेलो आणि मॅडम माझ्याशिवाय हनीमूनसाठी परदेशात गेल्या." सुनीता मला माझ्यापेक्षा चांगली ओळखते, पण त्यामुळेच आमचे नाते आजही ताजे आहे असेही अनिल यांनी नमूद केले.