अभिनेत्री आणि डिझायनर गुल पनाग आता आगळ्यावेगळ्या कारणानं चर्चेत आली आहे. ती तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखली जाते, मात्र यावेळी तिनं चाहत्यांना चकित केलं आहे.
आता गुल पनागचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिनं चक्क आता साडीमध्ये पुश अप्स केले आहेत. या व्हिडीओत ती चक्क साडी नेसून पूश अप्स मारताना दिसत आहे.
हे अवघड काम तिनं अतिशय सोप्या पद्धतीनं करुन दाखवलं आहे. तिनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
तिनं या व्हिडीओला 'कधीही आणि कुठेही' असं कॅप्शनही दिलं आहे. तिच्या या पोस्टवरुन तिचं फिटनेस क्रेझ दिसत आहे.
ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नेहमीच व्यायाम करते आणि याची झलक ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यानं देत असते.