कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. (APMC Mask Distribution social distancing)
Follow us
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये मास्क घेण्यासाठी चांगलीच झुंबड उडाली होती.
एपीएमसी मार्केट
नवी मुंबईच्या एपीएमसी बाजार आवारातील पाच मार्केटमध्ये रिलायन्स फाऊंडेशनतर्फे 50 हजार मास्कचे वाटप करण्यात आले. भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास 700 गाड्यांची आवक झाल्याने आधीच गर्दी होती.
त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये मास्क घेण्यासाठी चांगलीच झुंबड उडाली होती. एपीएमसी मार्केट हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. त्यामुळे हे व्यापारी आणि कर्मचारी कोरोनामुक्त राहावेत या भावनेने मार्केटमध्ये मास्क वाटप करण्यात आले.
भाजीपाला मार्केटमधील संचालक यांना गर्दी आटोक्यात आणणे अपेक्षित होते. पण संचालक दुसऱ्याने वाटप केलेले मास्क देतानाचे फोटो काढण्यात मग्न होत असल्याचे पाहायला मिळाले.
तर जमावाला आवाज देण्यासाठी स्वतः घातलेले मास्क काढून बोलत होते. त्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये मास्क वाटप कार्यक्रमाचे तीनतेरा वाजले.
भाजीपाला मार्केट परिसरात मास्क वाटप करताना प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. एपीएमसीत नियोजन शून्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याने सुरक्षा रक्षकांना येथील गर्दी आवरता आली नाही.
तर एपीएमसी प्रशासनाने यात लक्ष न घातल्याने येथील गर्दी आवरण्यात सुरक्षा रक्षकांना अपयश आले. पण मास्क घेण्यासाठी कोरोना मार्गदर्शक तत्वे गुंडाळून ठेवून प्रचंड गर्दी करण्यात आली.
कुठेही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात न आल्याने भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळाली.
गर्दी आटोक्यात येत नसल्याने शेवटी महापालिका कर्मचारी आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले.
आले. पालिका वाहनाने सायरन दिल्याने काही गर्दी पांगली गेली. तर पोलीस आल्यानंतर जमावाला हटवून काही वेळासाठी मास्क वाटप बंद करण्यात आले.