'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली आहे.
आता ती नवनवीन लूक्समध्ये चाहत्यांची मनं जिंकत आहे.
अपूर्वानं आता एक हटके फोटोशूट केलं आहे. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.
अपूर्वानं नुकतंच महिला दिनानिमित्त खास फोटोशूट केलं होतं. त्या फोटोशूटची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
आता शेवंताचा हा नवा अंदाज चाहत्यांच्याही पसंतीस उतरतोय.