Tour Plan : तुम्ही अंदमानला फिरायला जाताय? तर कमी पैशात असा आखाल प्लान
तुम्हाला अंदमानला फिरायला जायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आयआरसीटीसीने अंदमान फिरायची इच्छा असणाऱ्यांसाठी एका पॅकेजची घोषणा केली आहे.
अंदमानला जाण्यासाठी इतका कमी खर्च येईल, कसं ते जाणून घ्या
Follow us
अंदमान निकोबार बेट सर्वात लोकप्रिय टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो प्रवासी फिरण्यासाठी येतात. आयआरसीटीसीनं या ठिकाणी फिरण्याची इच्छा असणाऱ्यांना खास पॅकेज जाहीर केलं आहे.
आयआरसीटीसीचं एअर टूर पॅकेज 29 एप्रिलपासून सुरु होईल. हा टूर 6 दिवस आणि 7 रात्रीसाठी असणार आहे. यासाठी पहिल्यांदा हैदराबादहून पोर्ट ब्लेयरला विमानाने प्रवास असेल. त्यानंतर एसी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था असेल. त्याचबरोबर तमाम बीचवर क्रुज शिपचा आनंद लुटू शकता.
या टूर पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनरची सोय असणार आहे. या टूर दरम्यान 4 ब्रेकफास्ट आणि 5 डिनर अशी व्यवस्था असेल. यात नॉर्थ बे आयलँड आणि हॅवलॉक आयलँड फिरण्याची संधी मिळेल.
अंदमान टूर पॅकेज 42,885 रुपये ते 55,780 रुपयांपर्यंत आहे. सिंगल बुकिंकसाठी तुम्हाला 55780 रुपये भरावे लागतील. जर दोन लोकांसाठी बुकिंग करायचं असेलं तर प्रत्येकी 43,170 रुपये लागतील.
या व्यतिरिक्त तीन लोकांसाठी 42,885 प्रत्येकी भरावे लागतील. 5 ते 11 वर्षामधील मुलांना बेडसह 38,600 रुपये भरावे लागतील. आयलँड आणि बीच प्रेमींसाठी हा टूर पॅकेज स्वस्त आणि मस्त आहे.